illegal sand mining : केळणा नदीपात्रात वाळू माफियांचा पर्दाफाश

१० लाखांच्या ट्रॅक्टरसह दोघे जाळ्यात!; पोलिसांची कारवाई
illegal sand mining
illegal sand miningpudhari photo
Published on
Updated on

जालना : जाफराबाद तालुक्यातील टाकळी शिवारामधील केळणा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या तस्करांवर महसूल पथकाने धडक कारवाई करत १० लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांवर जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाफराबादचे मंडळ अधिकारी संतोष कपूर व ग्राममहसूल अधिकाऱ्यांचे पथक टाकळी शिवारात गस्त घालत होते. यावेळी केळणा नदीत दोन ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीरपणे वाळू भरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

illegal sand mining
Jalna Matang community rally : ‘महामोर्चा’तून एससी आरक्षण उपवर्गीकरण समर्थनाचा नारा

महसूलचे वाहन पाहताच चालकांनी नदीतून पळ काढत कारवाई टाळण्यासाठी ट्रॉलीतील वाळू रस्त्यावरच ओतून दिली व वाहने भरधाव पळवली. महसूल पथकाने चिकाटीने पाठलाग करत टाकळी गावातील एका शेतात लपवून ठेवलेले जॉनडीअर (एमएच२१ एडी ४१९८) व सोनालिका कंपनीचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले.

या वाहनांमध्ये वाळूचे अवशेष आढळल्याने वाळू चोरी सिद्ध झाली. याप्रकरणी आरोपी मुरली साहेबराव फोलाने (वय ३५) व समाधान उत्तम मरकड (वय ३२, दोघे रा. टाकळी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) व खाण-खनिज कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हवालदार प्रभाकर डोईफोडे पुढील तपास करत आहेत.

illegal sand mining
Mata Ramai Gharkul Yojana : घरावर फलक लावल्यानंतरच घरकुलचा अंतिम हप्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news