

Parner’s two-hundred-year-old ancient gateway has collapsed!
अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील पारनेर येथील सुमारे दोनशे वर्षांहून अधिक पुरातन असलेली गावाची वेस आणि तिचे दोन्ही बुरुज शनिवारी (दि. २४) दुपारी अचानक कोसळले. गावाच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेली ही वास्तू ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही वेस अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असतानाही घटना घडली, त्या वेळी जवळ कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर मारुती मंदिराच्या सभामंडपाचे काम करण्यापूर्वी वेशीची नव्याने उभारणी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.
पारनेर येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध मारुती मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम गेल्या चार-पाच दिवसांपासून लोकवर्गणीतून सुरू आहे. या कामासाठी पायाचे खोदकाम सुरू असताना शनिवारी दुपारी वेशीच्या डाव्या बाजूचा बुरुज अचानक ढासळला. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण वेस आणि उजव्या बाजूचा बुरुजही कोसळला. अत्यंत रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, त्या वेळी वेशीजवळ कोणीही नसल्याने अनर्थ टळला.
वेस आणि बुरुज अत्यंत जुने असल्याने बांधकाम काही प्रमाणात जीर्ण झाले होते. सभामंडपाच्य कामासाठी पायाचे खोदकाम सुरु असतानाच ही वास्तू कोसळल्यान गावातील ऐतिहासिक वारशाचे मो नुकसान झाले आहे. हा वारसा पुन्ह उभा करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाका घेतला असून, सभागृहाच्या कामापूल वेशीचे बांधकाम करण्याचा निर्णन घेतला आहे.
या उपक्रमात माजी सरपंच दुष्यं जाधव, माजी उपसरपंच शफिक शेख राम गाडेकर, दामोदर गाडेकर, माज पंचायत समिती सदस्य प्रल्हाद जाधव कबीर महाराज राजपूत, विष्णू चव्हाण संदीप गाडेकर, शिवाजीराव गाडेक यांच्यासह ग्रामस्थ सक्रिय सहभाग घे आहेत. दरम्यान, या घटनेचा पंचनाम करण्यात यावा, यासाठी अंबड येथील राम लांडे यांनी पारनेर सजाच्य तलाठ्यांकडे अर्ज केला आहे. पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याच गरज व्यक्त होत आहे.