Jalna Drought : दुष्काळाचा कहर ! पाण्याअभावी मोसंबीची हजार झाडे जेसीबीने उपटली

राहेरा शिवारातील सात एकरांतील बाग जळाली; १२ वर्षांपासून जीव लावून जोपासलेली बाग मातीमोल, शेतकरी हतबल
Jalna Drought
Jalna Drought : दुष्काळाचा कहर ! पाण्याअभावी मोसंबीची हजार झाडे जेसीबीने उपटलीfile photo
Published on: 
Updated on: 

The havoc of drought! A thousand sweet lime trees uprooted by a JCB due to a lack of water

अविनाश घोगरे

घनसावंगी : पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा मोठा फटका खरीप पिकांसह फळबागांनाही बसत आहे. पाण्याअभावी डोळ्यांदेखत फळबागा करपून जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राहेरा शिवारातील शेतकरी गणेश वाघमारे यांच्या सात एकरांतील मोसंबीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे जळून गेल्याने अखेर सुमारे एक हजार झाडे जेसीबीच्या साहाय्याने उपटून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. बारा वर्षे जीव लावून जोपासलेली बाग उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ आल्याने वाघमारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Jalna Drought
Bhokardan : पावसाअभावी तूर संकटात; लाखोंचे नुकसान

राहेरा शिवारातील गट क्रमांक १५६ मध्ये गणेश वाघमारे यांनी सन २०१४ मध्ये मोसंबीची लागवड केली होती. त्यानंतर गेली बारा वर्षे त्यांनी बागेची नियमित निगा राखली. खत, औषधे, मजूरी आणि पाण्यासाठी मोठा खर्च केला. मेहनतीने बाग बहरली आणि त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाच्या दुष्काळाने त्यांच्या बारा वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरले.

पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने परिसरातील जलस्रोत आटले आहेत. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली असून, उपलब्ध पाण्यात पिके जगविणेही कठीण झाले आहे. मोसंबीच्या झाडांना नियमित पाण्याची गरज असताना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. सुरुवातीला झाडांची पाने सुकू लागली. त्यानंतर फांद्या वाळल्या आणि काही दिवसांत संपूर्ण बाग करपून गेली.

Jalna Drought
Crime News : कोर्टातील केस मागे घेण्यासाठी तरुणावर जीवघेणा हल्ला

ज्या झाडांना बारा वर्षे जीव लावून वाढविले, त्याच झाडांवर जेसीबी चालविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. सात एकरांतील संपूर्ण मोसंबीची बाग नष्ट झाल्याने वाघमारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाग उभी करण्यासाठी केलेला खर्च, बारा वर्षांची मेहनत आणि भविष्यातील अपेक्षित उत्पन्न यावर पाणी फेरले गेले, फळबाग नष्ट झाल्याने आगामी काळातील उत्पन्नाचा आधारही हिरावला गेला असून, आता पुन्हा नव्याने शेती उभी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news