

Jalna News On the registration form for making illiterate adults literate
सादिक शेख
आन्वा : प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शासनाच्या वतीने नवसाक्षरता अभियान राबविले जात आहे. मात्र, नवसाक्षरांची नोंदणी करून त्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. रविवारी आयोजित नवसाक्षरता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर काही केंद्रांवरील परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाले असून, अभियानाची अंमलबजावणी कागदोपत्रीच सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
भोकरदन तालुक्यासह आन्वा, आन्वा पाडा, वाकडी, कुकडी, कोदा, धौडखेडा, जानेफळ गायकवाड, कल्याणी, कारलावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासनाकडून निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. रविवार, दि.२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नवसाक्षरता परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात येत आहे.
तर काही शाळांमध्ये ज्या प्रौढ नवसाक्षरांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली, त्यांनाच परीक्षेबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर शालेय वयोगटातील विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच काही प्रौढांना परीक्षेची माहिती नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
काही परीक्षा केंद्रांवर शालेय वयोगटातील विद्यार्थी परीक्षा लिहिताना दिसल्याचे समोर आले आहे. तर काही ठिकाणी नवसाक्षर प्रौढांनाच परीक्षेबाबत माहिती नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जे पौढ परीक्षेला आले त्यानां कधीच शिकवले नाही, अशी परिस्थितीत समोर आली आहेत. पौढांना साक्षर करण्याच्या योजनेत नोंदणी महत्त्वाची अब्दुल शुकर देशमुख हायस्कुल आन्वा असली, तरी प्रत्यक्ष शिक्षण हाच अभियानाचा खरा उद्देश आहे. त्यामुळे 'नोंदणी झाली, मग शिकविले तरी का नाही?' या प्रश्नाचे उत्तर शिक्षण विभागाने द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवसाक्षरांची नोंदणी केली, शिकविले किती ?
अभियानांतर्गत प्रौढ निरक्षरांची नोंदणी करणे, त्यांना वाचन-लेखनाचे शिक्षण देणे आणि परीक्षेसाठी तयार करणे अपेक्षित आहे.
मात्र, नोंदणी झालेल्या प्रौढांना प्रत्यक्ष किती दिवस शिकविण्यात आले, त्यांची उपस्थिती किती होती आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी झाली का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.