

Panjrapol Gaushala receives the Pure Indigenous Cattle Breed Conservation Award
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील श्री गौरक्षण पांजरापोळ गोशाळेस महाराष्ट्र शासन गौसेवा आयोगातर्फे दिला जाणारा शुद्ध देशी गौवंश संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रजासत्ताक दिनी पोलिस कवायत मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात पालक मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड, भास्कर दानवे, बद्रीनाथ पठाडे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रशांत चौधरी, सहायक आयुक्त डॉ. रमेश पाटील, डॉ. योगेश गायकवाड, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय झांबरे यांची उपस्थिती होती.
पांजराप-ओळ गौशाळेचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल यांच्यासह कोषाध्यक्ष विजय कामड़, विश्वस्त कैलाश गोरंट्याल, ओमप्रकाश मंत्री, बनारसीदास जिंदल, सुभाषचंद्र देवीदान, महेन्द्र भक्कड़, कैलाश बियाणी, विजय राठी, अनिल सोनी, संजय लाहोटी यांनी पुरस्कार स्वीकारला.