

Two accused in a serious crime have been taken into custody
जालना, पुढारी वृत्तसेवा येथील कदिम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील गोपाळपुरा भागात राहत असलेल्या बळीराम इंगळे यास धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. आर ोपींचा शोध घेण्यासाठी कदिम जालना व सदर बाजार पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. आरोपी आसेफ सय्यद पी. वहाब सय्यद (रा. गोपालपुरा जालना) व माजेद पी. लतीफ शेख (रा. सुंदरनगर जालना) यांना पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आनंदसींग साबळे, पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप, जमादार रामप्रसाद रंगे, धंनजय कावळे, रामेश्वर जाधव, नजीर पटेल, पोलिस कर्मचारी अजीम शेख, दुर्गेश गोफणे, भगवान गुंजाळ, गणेश तेजनकर, इम्रान खान, सागर खैरे, चालक हिवाळे, कल्पेश पाटील यांनी केली.