

All-party leaders pay tribute to the late Ajit Pawar
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन येथील रत्नमाला लॉन्स येथे आयोजित सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्याच्या शोकसभेत स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेस माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिंबकआप्पा पाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ युवा नेते सुधाकर दानवे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब वानखेडे, विशाल गाडे, उबाठा, गटाचे जिल्हा उपप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश पुरोहित, रमेश सपकाळ, विकास जाधव, बोरसे, सर्जेराव कड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सपाटे, माजी सभापती लक्ष्मण दळवी, मनीषाताई जंजाळ, सुनील साबळे, केशव पाटील जंजाळ आदींची उपस्थिती होती.
यावेळी सुरेश सपाटे, मनीषा जंजाळ, केशव पाटील जंजाळ, लक्ष्मण पाटील दळवी, मदनराव तुपे, मनीष भावप श्रीवास्तव, नानासाहेब वानखेडे, यांनी अजित पवारांच्या जिवनावर प्रकाश टाकला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुधाकर दानवे यांनी शोकसंदेश व्यक्त केला.
यावेळी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साबळे व ज्ञानेश्वर गाढे यांनी केले. आभार केशव पाटील जंजाळ यांनी व्यक्त केले.