Agriculture News : सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव

पिंपळगावच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर संकट
Agriculture News
Agriculture News : सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भावfile photo
Published on
Updated on

Outbreak of Kokada disease on capsicum

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Agriculture News
Jalna Agriculture News : मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात सिमला मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पेरणीचा हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर हजारो रुपये खर्च करून मिरचीची रोपे जगवली. मात्र पाऊस सुरू होताच मिरचीवर कोकडा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून, शेतातील उभे सिमला मिरचीचे पीक कोकडा रोगामुळे अडचणीत सापडले आहे.

सुरुवातीला पानांवर कोकडा येऊन ते वाळू लागले. नंतर फळांवर काळे डाग पडून मिरची सड्डू लागली. फवारणी करूनही रोग आटोक्यात न आल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला. एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच न आल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील काही भागांतही हीच स्थिती आहे. टँकर, मजुरी, खते, औषधांवर केलेला खर्च निघणेही मुश्कील झाले आहे.

Agriculture News
Beed Agriculture News : अर्धा जून महिना संपला, पाऊस बेपत्ता!

त्यामुळे बँकेचे कर्ज व सावकारी कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत शेतकरी आहेत. पावसाळा लांबल्याने सुरुवातीला मिरची वाचविण्यासाठी पाण्यात आणि आता कोकडा पडल्याने औषधात पैसे खर्च होत आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये दोन एकर सिमला मिरचीची लागवड केली होती. परंतु सिमला मिरचीला पाणी नसल्याने मी विकत घेऊन सिमला मिरचीला जगवले. परंतु या मिरचीवर पाऊस पडल्यानंतर कोकडा रोग पडल्याने पूर्ण मिरची खराब झाली आहे.
- समीर पठाण, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news