

One thousand year old Kodeshwar Mahadev Temple
श्रावण सोमवार विशेष
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील कोदा येथे जुई नदी काठावर पूरातन कोदेश्वर महादेव मंदिर एक हजार वर्ष जुने आहे. भाविकांची मनोकामना पुर्ण होत असल्याने या ठिकाणी दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते.
या मंदिराची स्थापना सुमारे एक हजार वर्षापूर्वी कोडानेश्वर गिरी महाराजांनी केली असल्याचे सांगितले जाते. नंतरच्या काळात पाचशे वर्षांपूर्वी आजुबाई देवीचे वडील तुकाराम पंत यांनी दररोज कोदा येथे येऊन आराधना सुरू केली तेव्हापासून कोदेश्वर असे नाव पडले आहे.
तसेच तुकाराम पंत यांना संतान नसल्याने ते आन्वा येथून कोदा येथे जाऊन कोदेश्वराची पूजा अर्चना करत असताना त्यांना एका महापुरुषाने आशीर्वाद दिला. त्यावेळी आजुबाई देवीचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे कोदेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदीरांसमोर ऐतिहासिक वारसा असलेल्या मोठे वडाचे झाड असून या वडाच्या वृक्षला जवळपास ४५० वर्ष झाले आहेत. आज हे वृक्ष उभे आहे. वडाचे झाड किमान १००० वर्षं जगते. वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजेचे स्थान मिळाले आहे.
वटसावित्रीची कथा या वृक्षाबरोबर गुंफली गेली आणि हा वृक्ष पूजनीय ठरला. या कथेतील सावित्री जितकी मोठी आणि आदर्श मानली जाते तितकाच वडही निसर्गातील एक मोठा आणि आदर्श वृक्ष आहे. निसर्गातील वडाचे स्थान व उपयोग लक्षात घेतले तर तो निश्चितच पूजनीय असे म्हणता येईल. गेल्या शेकडो वर्षांपासून उभे असलेले आज हे बड परिसरात एकमेव प्रसिद्ध आहे.