

One killed in Tata Magic two-wheeler accident
माहोरा, पुढारी वृत्तसेवाः जाफराबाद-माहोरा रस्त्यावरील जानेफळ पाटीजवळ दोन दुचाकी व टाटा मॅजीक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात गणपत शिंगारे (६०) यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या पत्नीसह दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
गणपत शिंगारे हे पत्नीसमवेत मोटरसायकलवरून माहोराकडे जात होते. जानेफळ पाटीजवळ वळण घे तेवेळी समोरून येणाऱ्या सय्यद रफिक बझरुद्दीन यांच्या मोटरसायकलसोबत समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले याच वेळेस पाठीमागुन येणाऱ्या टाटा मॅजीकने गणपत शिंगारे यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मयत गणपत शिंगारे यांचा मृतदेह जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गंभीर जखमी असलेल्या शिंगारे यांच्या पत्नी आणि दुसऱ्या दुचाकीवरील सय्यद रफिक बझरुद्दीन यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती.