No mobile network : डोणगाव शिवारात मोबाईलला रेंज मिळेना, ग्राहक वैतागले

तीन महिन्यांपासून नेटवर्क नसल्यामुळे डोकेदुखी वाढली
mobile network
No mobile network : डोणगाव शिवारात मोबाईलला रेंज मिळेना, ग्राहक वैतागलेfile photo
Published on
Updated on

No mobile network in the Dongargaon area; customers frustrated

डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डोणगावसह परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईलचा नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना मोबाईल धारकांना डोकेदुखी वाढले डोणगावसह परिसरामध्ये विविध नेटवर्क टॉवर उभारणी करण्यात आले ते टावर फक्त ग्राहकांची लूट करण्याकरिता उभारण्यात आले की काय असा प्रश्न मोबाईल धारक उपस्थितीत करत आहे.

mobile network
Chhatrapati Sambhajinagar News : जलसंपदात कामाआधीच कंत्राटदार फायनल

नेटवर्क येत नसल्यामुळे नागरिकांना झाडावर किंवा उंच टेकडीवर जाऊन मोबाईलच्या साह्याने बोलण्याची वेळ उंच टेकडीवरसुद्धा नेटवर्क येत नाही. त्या ग्राहकांची महिन्याला मोबाईल रिचार्ज करावे लागत आहे त्यामुळे हजारो रुपये कंपनीकडे जमा होत आहे.

त्या टॉवरची सुविधा ग्राहकांना मिळत नसल्यामुळे मोबाईलधारक नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे. ग्राहक मंच यांनी दखल घेऊन संबंधित कंपनीची नागरिकांची खरोखर फसवणूक होत आहे की काय याची शहानिशा करावी व संबंधित नेटवर्क कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांतून व मोबाईलधारकांतून होत आहे.

mobile network
Sindhudurg Protest : अन्यायकारक स्मार्ट मीटर लादता, ग्राहकांचे प्रश्न सोडविणार कोण?

ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन ते तीन मोबाईल मोबाईल धारक आहे. त्या मोबाईलधारकांना शासनाचा किंवा खासगी मोबाईल वरील ओटीपी याकरिता प्रत्येकाजोड मोबाईल फोन वापरण्यात येत आहे, पण त्या मोबाईलवर बोलण्याच्या वेळी नेटवर्क उपलब्ध होत नाही.

अनेकांना त्रास सहन करावे लागत आहे कंपन्या मात्र रिचार्ज अगोदर करतात त्यानंतर लागणारी सुविधा देत नसल्यामुळे मोबाईल धारकांत संतापाची लाट पसरली आहे. नेटवर्क तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे नसता कंपनीच्या विरोधात आंदोलन ठेवण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news