Arjun Khotkar : शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही

आमदार अर्जुन खोतकर : खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे
Arjun Khotakar
Arjun Khotkar : शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नाहीFile photo
Published on
Updated on

No compromise on the interests of farmers will be tolerated : MLA Arjun Khotkar

जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामासाठी प्रशासनाने शेतक-यांच्या दृष्टीने चांगले काम कराव शेतक-यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला.

Arjun Khotakar
Jalna News : १३०३ कोटींचे उद्दिष्ट; वाटप ४९ कोटी !

जालना तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक २०२६ आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, प्रभारी तहसीलदार राजु निहाळ, गटविकास अधिकारी घोळवे, उपविभागीय कृषी अधिकारी पवार, तालुका कृषी अधिकारी राठोड यांच्या उपस्तितीत झालेल्या संपन्न झाली बैठकीत आमदार अर्जुन खोतकर यांनी अत्यंत सखोल व वास्तवता यासंबंधी स्पष्ट व कडक आदेश दिले.

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आमदार खोतकर यांनी दिले आहेत. शेतकरी हा शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून प्रशासनाने केवळ कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Arjun Khotakar
Chhatrapati Sambhajinagar News | शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही : आ. भुमरे

आमदार अर्जुन खोतकर यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी बियाणे, खते आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांना प्रमाणीत बियाणे योग्य दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाने दररोज तपासणी मोहीम राबवावी.

शेतकऱ्यांना लिंकिंग खाते व बियाणे लादण्याची शक्ती करू नये अशी शक्ती करणाऱ्या विक्रेत्या कडक कारवाई करावी, आदी सूचना आमदार खोतकर यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी कृषी श्री पवार, तालुका कृषी अधिकारी राठोड, नायब तहसीलदार राजू निहाळ, लिंग बँक मॅनेजर, महावितरण चे अधिकारी, महसूल व कृषी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, व्यापारी प्रतिनिधी प्रगतसिल शेतकरी आदी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी कृषी श्री पवार, तालुका कृषी अधिकारी राठोड, नायब तहसीलदार राजू निहाळ, लिंग बँक मॅनेजर, महावितरणचे अधिकारी, महसूल व कृषी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, व्यापारी प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते.

प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

या बैठकीमध्ये मागील हंगामात सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा आंबा यांसारख्या पिकांचे अधिक उत्पन्न घेणारे प्रगतशील शेतकरी विशाल रामकिसन जायभाई वंजार उमरद, रुख्मिणीबाई नवनाथ गोरडे दरेगाव, मंदाबाई प्रल्हाद देशमुख कारला, संताजी मुकुंदा भोईटे अंतरवाला, राजेश भिकुलाल इंदानी भाटेपुरी यांचा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण् यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news