

Natural disaster relief fund scam: 2 revenue officials and an agent arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या नैसर्गीक आपत्ती घोटाळ्यात पोलिसांनी आरोपी तलाठी कैलास शिवाजीराव घारे (रा. केंधळी ता. मंठाजि जालना ह मु मिलेनीअम पार्क एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर), रमेश लक्ष्मण कांबळे (रा. गोकुळधाम इंदेवाडी अंबड रोड जालना) यांच्यासह दोन एजंटाना जेरबंद केले.
सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाले पासुन आरोपी फरार झाले होते ते पोलीसांचे नजरेआड राहत होते. आरोपी पोलीस शोध घेऊन नये या साठी मोबाईल वापरत नव्हते तसेच सोशल मिडीया पासुन सुध्दा लांब राहत होते. त्यामुळे त्यांचे अटकेसाठी अडसर येत होते तरी सुध्दा त्यांचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने यापुर्वी एकुण २७ आरोपीना अटक केली आहे.
या प्रकरणात खासगी इसम राजेंद्र रघुनाथ मोताळे (रा. बेलगाव ता. अंबड जि जालना) व ज्ञानेश्वर नारायण गारोळे (रा. दहयाळा ता अंबड जि जालना) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आजपर्यंत त ३१ आरोपीना अटक करण्यात आली आहे.