देशी दारू दुकानदाराकडून शेजाऱ्यास बेदम मारहाण

जुना जालना भागातील कसबा परिसरात विठ्ठल मंदिर रोडवरील भरवस्तीमध्ये असलेल्या देशी दारू दुकानाला लागून राहणाऱ्या मंगेश कहऱ्हाळे यांना देशी दारु दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
jalna crime news
देशी दारू दुकानदाराकडून शेजाऱ्यास बेदम मारहाणfile photo
Published on
Updated on

A country liquor shop owner brutally beat up his neighbor

जालना, पुढारी वृत्तसेवाः जुना जालना भागातील कसबा परिसरात विठ्ठल मंदिर रोडवरील भरवस्तीमध्ये असलेल्या देशी दारू दुकानाला लागून राहणाऱ्या मंगेश कहऱ्हाळे यांना देशी दारु दुकानदारांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. सदर घटना गुरुवार (२९) रोजी घडली.

jalna crime news
Jalna News : बनावट वेबसाईट तयार करून लायसन्स

कसबा येथील या देशी दारु दुकानावर दारू पिण्यासाठी येणाऱ्या लोकांची सतत वर्दळ असते. दारू पिऊन हे लोक परिसरात शिवीगाळ व गोंधळ घालत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक वैतागून गेले आहेत. गुरुवारी (ता.२९) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दारू दुकानाच्या मालकाने मंगेश एकनाथ कहऱ्हाळे यांच्या घराच्या दरवाजाजवळ दारू उतरविण्यासाठी गाडी उभी केली होती.

सदरील गाडी बाजूला घेण्याची विनंती कऱ्हाळे यांनी केली असता दुकानदाराने कन्हाळे यांना शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्यामुळे तेथील राहिवासीयामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मंगेश कऱ्हाळे यांनी कदीम जालना येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कदीम जालना पोलिस ठाण्याच्या श्रीमती पंडुरे या करीत आहेत.

jalna crime news
Jalna News : कुपोषण निर्मूलन, यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी मित्तल

कसबा भागात भरवस्तीमध्ये असलेल्या या देशी दारुचे दुकान इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशी अनेक वर्षांपासून करीत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागामुळे दुकानास अभय मिळाले आहे. त्यामुळे येथील दुकानदाराची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप आहे.

या ठिकाणी राहणारे नागरिक कुटुंबासह राहात असुन नौकरी व कामानिमीत्त त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे महीला व लहानमुलांना दारुड्यांचा त्रास होत आहे. या प्रकरणी पोलिस देशी दारू दुकानदारावर नेमकी काय कारवाई करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news