Nag Panchami : घरात नागपंचमी; दारात 'पत्ते' पंचमी, जुन्या परंपरेला वेगळे वळण

लाखो रुपयांची उलाढाल होणार, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
Nag Panchami
Nag Panchami : घरात नागपंचमी; दारात 'पत्ते' पंचमी, File Photo
Published on
Updated on

Nag Panchami Festival Celebrate at Anwa

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची आजही परंपरा कायम असुन यात तरूणांसह वृध्दांचाही समावेश असतो. त्यामुळे घरात नागपंचमी आणि दारात पत्ते पंचमी साजरी केली जाते ही एक जुनी परंपरा आजही कायम असून या परंपरेला वेगळे वळण लागत आहे.

Nag Panchami
Shravan Somvar : 'हर हर महादेव'च्या गजराने जिल्हा दुमदुमला

नागपंचमीचा सण संपल्यानंतरही अनेक गावांत पत्त्याचे डाव रंगतात. पवित्र श्रावणाचा महिना म्हणजे सणांची मांदियाळीच, नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपंचमी या सणाला अनन्य साधारण महत्त्व असले तरी काही कुप्रथाही अनेक वर्षांपासून रूढ झाल्या आहेत. आषाढ महिन्यातील दीप अमावस्येला 'गटारी अमावस्या' साजरी केल्यानंतर गावागावातील जुगारी नागपंचमीच्या दिवशी 'पत्ते पंचमी' साजरी करीत दिवस-रात्र पत्त्यांच्या डावात लाखो रुपयांची उलाढाल करून कुणी कंगाल तर कुणी मालामाल होतात.

जुगार्यांना पर्वणी ठरलेल्या पत्ते पंचमीला आन्वासह परिसरातील आन्वा, आन्वापाडा, वाकडी, कुकडी, जानेफळ गायकवाड, कारला, धोंडखेडा, कोदा गावात पत्त्यांचे मोठे डाव भरविले जात असल्याने पोलीस प्रशासक याकडे लक्ष देतील का असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. अनेक गावामध्ये तर या डावाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप येते. यात एका बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.

Nag Panchami
Mahadev Temple : श्रीक्षेत्र विज्ञानेश्वर आपेगावात महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी

ग्रामीण भागात दिवस उगवल्यापासूनच सर्रासपणे कोणाचीही भीती न बाळगता पत्त्यांचे डाव सुरू होते. आन्वासह ग्रामीण भागात या दिवशी खेळल्या जाणाऱ्या जुगाराकडे पोलिसांचाही काना डोळा असतो. नागपंचमीच्या दिवशी सुरू असलेल्या या पत्ते पंचमीच्या खेळात जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. दिवस आणि रात्रभर खेळल्या जाणाऱ्यां या पत्त्यांच्या खेळात लाखो रुपयांची उलाढाल होते.

प्रथा बंद करा

गेल्या अनेक पिढ्यांपासुन घरात 'नागपंचमी' तर गावात सार्वजनिक 'पत्तेपंचमी' साजरी होताना दिसून येत आहे. पत्त्यांच्या या खेळांमुळे तरुणपिढी व्यसनाधीन होऊन नादी लागत आहे. जुगाराच्या या खेळात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही प्रथा बंद करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news