

Murder over agricultural dispute; Accused arrested within two hours
परतूर, पुढारी वृत्तसेवा : शेतातील सामाईक बांधावरुन पावसाचे पाणी जाण्यासाठी चारी खोदल्याचे कारण विचारल्याने एका चौवीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. ही घटना परतूर तालुक्यातील वाढोना शिवारात घडली. किशोर तनपरे (२४) मयताचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
वाढोणा शिवारात तक्रारदार गणेश तुळशीदास तनपुरे व त्याचा मयत मुलगा किरण तनपुरे हे शेतात काम करीत असताना त्याचे चुलत भाऊ परमेश्वर गुलाबराव तनपुरे व त्याचा मुलगा किशोर परमेश्वर तनपुरे यांनी शेतातील सामाईक बांधावरुन पावसाचे पाणी जाण्यासाठी तक्रादार याचे बाजुने चारी खोदली.
याबाबत तक्रारदार यांनी विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करुन तक्रारदार यांना चापटवुक्याने मारहाण करुन खाली पाडले. तेव्हा तक्रारदार यांचा मयत मुलगा किशोर तनपुरे याने मध्यस्ती होवुन माझ्या वडीलांना कशाला मारहाण करता असे म्हणताच आरोपीने बाधावरील दगडाने किरण तनपुरे याचे डोक्यावर, चेह-यावर जबर मारहाण करुन त्यास जागीच ठार मारुन गुन्हयाचे ठिकाणावरुन पसार झाला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय, परतूर येथे पाठवून गुन्ह्यातील २ आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोर्पीना अटक करण्यात आले आहे.