

Chilli farmers in the jalna district are in trouble
जालना, पुढारी वृत्तसेवा: मागील काही वर्षांत शेती करणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मिरचीची लागवड करायला सुरुवात केली आहे. भोकरन, जाफराबाद तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात येते. यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन्न व भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा मिरचीकडे बळवला आहे. या उन्हाळी मिरचीला अगोदरच उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. त्यामुळे काही प्रमाणात मिरचीची रोपे जळून गेली होती. आता कोकड़ा पडला. यामुळे सततच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी कुठल्यान कुठल्या कारणाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसून येत आहे.
जालना शहराची बाजारपेठ जवळ असल्याने शहरातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरवारील गावात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करण्यात येते. याशिवाय भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, पारध, वालसावंगी व जाफराबाद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतली जातात.
पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी मिरची बाजारपेठ आहे. या ठिकाणी बाहेर राज्यातून मिरची व्यापारी खरेदीसाठी येतात. यावर्षी मिरची पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मिरचीवर बोकड्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कालिटी घसरली आहे. यामुळे मिरची उत्पादक हवालदिल झाला आहे.
भोकरदन तालुका शेती मिरची उत्पादक म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी बातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्राद्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली लागलेला खर्चही निघणार नाही. परिणामी, दिल्ली आणि बंगळ रुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन व भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा मिरचीकडे बळबला आहे. या उन्हाळी मिरचीला अगोदरच उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. त्यामुळे काही प्रमाणात मिरचीची रोपे जळून गेली होती. आता कोकडा पडला. यामुळे सततच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी कुठल्यान कुठल्या कारणाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसून येत आहे.