Jalna News : घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्ती विसर्जनास मनपाकडून मनाई

पाणी प्रदूषण टाळा; नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराc
Ganesh idol immersion
Jalna News : घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्ती विसर्जनास मनपाकडून मनाईfile photo
Published on
Updated on

Municipal Corporation bans Ganesh idol immersion in Ghanewadi Reservoir

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी केले आहे. शुक्रवार, दि. २५ रोजी गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना हे आवाहन केले आहे.

Ganesh idol immersion
Jalna News : लोकप्रतिनिधी बांधावर; करपलेल्या स्वप्नांना धीर

घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा उपयोग जालना शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे जलाशयातील पाणी प्रदूषित होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी जलाशयात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मनाई असतानाही काही नागरिकांकडून जलाशयात गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. यंदा जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे संरक्षण करणे अधिक गरजेचे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घाणेवाडी जलाशयात मनाई असतानाही विसर्जन करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार गुन्हा दाखल करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

Ganesh idol immersion
Bhokardan : खा. कल्याण काळे यांच्याकडून भोकरदन तालुक्यातील पाहणी
नागरिकांनी सहकार्य करावे घाणेवाडी जलाशय हे जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करून महापालिकेच्या अधिकृत विसर्जन स्थळांचा वापर करावा.
अंजली शर्मा, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news