Jalna News : लोकप्रतिनिधी बांधावर; करपलेल्या स्वप्नांना धीर

आमदार उढाण, माजी रेल्वे राज्यमंत्री दानवेंकडून पिकांची पाहणी
Jalna News
लोकप्रतिनिधी बांधावर; करपलेल्या स्वप्नांना धीर file photo
Published on
Updated on

MLA Udhan and former Minister of State for Railways Danve inspect crops

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात सुमारे ४५ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा भुगा झाला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपासी, तूर, मका आदी पिकांसह फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार हिकमत उढाण, आमदार संतोष दानवे आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यानी अंबड, भोकरदन आणि बदनापूर आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची सध्यस्थितीची पाहणी केली. त्वरित पंचनामा करुन शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. असा दिलासा तीन्ही लोकप्रतिनिधींकडून देण्यात आला. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

घनसावंगीचे विधानसभा मतदार संघाचे आमदार हिकमत उढाण यांनी तालुक्यात पडलेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मतदारसंघातील शेवटच्या टोकातील टाका व दुनगाव, ता. अंबड येथील शिवारात बुधवार, दि. २३ रोजी प्रत्यक्ष पीक पाहणी केली. कापूस, तूर, मका व सोयाबीन आदी पिक हातची गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. यावेळी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या केवळ ७७दिवस पुरेल येवढाचा चारा शिल्लक आहे.

येत्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू शकते. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास आमदार हिकमत उढाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी वडीगोद्री सर्कल व साष्ट पिंपळगाव सर्कल मधील शिवसेना पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाकडे पाठपुरावा करणार यावर्षी नियमित पाऊस पडला नाही. मोठा खंड पडल्यामुळे लघु मध्यम प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, पिक पूर्णपणे वाळून गेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
हिकमत उढाण, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news