Bhokardan : खा. कल्याण काळे यांच्याकडून भोकरदन तालुक्यातील पाहणी

पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके वाया जाऊन पिण्याच्या पाण्याचा तसेच गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
Bhokardan
Bhokardan : खा. कल्याण काळे यांच्याकडून भोकरदन तालुक्यातील पाहणीfile photo
Published on
Updated on

Inspection by MP Kalyan Kale in Bhokardan Taluka

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके वाया जाऊन पिण्याच्या पाण्याचा तसेच गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची खासदार कल्याण काळे यांनी पाहणी केली. त्यांनी वाडी शिवारांमधील शेतामध्ये जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली व शासनाने आचारसंहितेचा कोणताही मुद्दा उपस्थित न करता तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

Bhokardan
Arjun Khotkar : जरांगे, मिशा आम्हालाही आहेत !

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि.२३ रोजी भोकरदन तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, बदर चाऊस, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, रऊफ परसुवाले, राजाभाऊ कुलकर्णी, अशोक उबाळे, शांतीलाल बनसोडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, रमेश जाधव, जहीर कुरेशी, भूषण जाधव, श्रवणकुमार अक्से, यांची उपस्थिती होती.

Bhokardan
Jalna News : लोकप्रतिनिधी बांधावर; करपलेल्या स्वप्नांना धीर

खरीप पिकांची सद्यस्थिती, संभाव्य उत्पादनातील घट तसेच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याच्या परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news