

Municipal bulldozer targets road encroachments in Ambad city
अंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड शहरात नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आहे. ही कारवाई रविवार, दि. ५ रोजी करण्यात आली.
दरम्यान, अंबड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जालना-बीड रोडवरील शिवाजी महाराज चौक अर्थात बसस्थानक ते श्री मत्स्योदरी देवी मंदिर परिसरापर्यंत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत रस्त्याच्या कडेला करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात आले.
तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे साहित्यही जप्त करून रस्ता मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली. यावेळी नगरसेवक केदार कुलकर्णी यांनी दुकानदारांशी संवाद साधत सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करू नये, असे आवाहन केले.