

आन्वा ः सध्या आधुनिक शेती केली जात आहे. मिरची, भाजीपाला, फळबागा तसेच अनेक वेगवेगळ्या पिकांसाठी अच्छादन म्हणून मल्चिंग पेपर चा वापर केला जातो. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे शेतात तणांची वाढ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो.
पारंपारिक शेती पध्दतीमध्ये केवळ कष्ट आणि उत्पादनात घट एवढचं शेतकऱ्यांना मिळते. मात्र, मेहनीतीच्या तुलनेत हवं तसे उत्पादन मिळत नाहीये. पण अधिकचा खर्चही करावा लागतो. मात्र, सद्यस्थितीत शेतीच्या काळाच्या अनेक बदल होत आहेत.
पीकाबरोबर तण वाढू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव पीकावर होऊ नये म्हणून टोमॅटो, मिरची सारख्या पिकाला संरक्षण केले जाणारे मल्चिंग आज शेती व्यवसयात संजवनी ठरत आहेत. त्यामुळे मल्चिंग पेपरचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत आहे.
मल्चिंग पेपरमुळं तापमान आणि आर्द्रता नियंत्रित झाल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो. अधिक पाऊस झाला तरी त्याचा फरसा परिणाम हा उत्पादनावर होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मल्चिंग पेपरला अधिक प्रतिसाद देत आहे. वाकडी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची आणि टोमॅटोचं उत्पादन घेतले जाते.
पाणी बचत होण्यास मदत
उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची कमतरता सर्वसाधारणपणे सर्व शेतकऱ्यांना भासत असते, परंतु मल्चिंग पेपरच्या माध्यमातून त्या बेडवरील बाष्पीभवन होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबते व त्यामुळे पाणी बचत होण्यास मदत होते जेणेकरून पुढील काळामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही.