MLA Arjun Khotkar : आ. खोतकर व्हीलचेअरवर मंत्रालयात

१८ गावांतील दीड हजार शेतकरी कुटुंबांच्या कर्जमुक्तीचा निर्णय
MLA Arjun Khotkar
MLA Arjun Khotkar : आ. खोतकर व्हीलचेअरवर मंत्रालयातfile photo
Published on: 
Updated on: 

MLA Khotkar arrives at Mantralaya in a wheelchair

जालना, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या चक्रात आडकलेल्या १८ गावांतील सुमारे १,५०० शेतकरी कुटुंबांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रालयात झाला. त्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अपघातात पायाला फॅक्चर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना एक ते दीड महिना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. तरीही अवघ्या आठ दिवसांत स्वतःच्या वेदना विसरत ते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी व्हीलचेअरवरून मंत्रालयात पोहोचले.

MLA Arjun Khotkar
Somthana Renukamata Temple : नवसाला पावणारी सोमठाण्याची रेणुकामाता

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुमारे ₹२२ कोटींचा दीर्घमुदतीचा कर्जप्रश्न ₹२.५ कोटींच्या एकरकमी तडजोडीतून (ओटीएस) निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तडजोडीची ही रक्कम शासन भरणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही.

या शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत समावेश करून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांनी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, तारणात अडकलेल्या जमिनी आणि नव्या कर्जासाठी येणाऱ्या अडचणी शासन व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

MLA Arjun Khotkar
Jalna News : जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंठा चौफुली ते न्हावा रस्त्याची पाहणी

कर्जमुक्तीचा मार्ग खुला

या बैठकीतील खोतकरांची उपस्थिती त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी ठरली. आपल्या प्रकृतीच्या अडचणींपेक्षा दीड हजार शेतकरी कुटुंबांच्या भविष्याला त्यांनी प्राधान्य दिले. स्वतःच्या पायाला दुखापत असतानाही शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खोतकर मंत्रालयात पोहोचले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने १८ गावांतील दीड हजार शेतकरी कुटुंबांच्या कर्जमुक्तीचा मार्ग खुला झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news