Somthana Renukamata Temple : नवसाला पावणारी सोमठाण्याची रेणुकामाता

Badnapur Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, भजन-कीर्तनाने परिसर भक्तिमय
Somthana Renukamata Temple
बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील रेणुकामातेचे मंदिर.pudhari photo
Published on: 
Updated on: 

बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील नवसाला पावणारी रेणुकामाता भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाते. गावालगतच्या डोंगरावर वसलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. जिल्ह्यासह विविध भागांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून, संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात रेणुकामातेच्या दर्शनाला विशेष महत्त्व असून, मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, या श्रद्धेने भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होत आहेत. अनेक भाविक नवस फेडण्यासाठीही मंदिरात दाखल होत आहेत. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होत असून, दिवसभर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Somthana Renukamata Temple
Jalna Water Scarcity : अनुदानाची प्रतीक्षा न करता विहिरीचे खोदकाम

नवरात्रोत्सवानिमित्त सोमठाणा येथील रेणुकामाता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भजन, कीर्तन आणि देवीच्या जयघोषामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत आहेत.

मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शनासाठी सोयीची व्यवस्था

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना सुलभरीत्या दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या सोमठाण्याच्या रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Somthana Renukamata Temple
Chhatrapati Sambhajinagar RTO Office : आरटीओ कार्यालय करोडीत, हेलपाटे वैजापूरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news