Stray dogs news : अंबडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; १५ जणांना चावा

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
Stray dogs news
Stray dogs news : अंबडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; १५ जणांना चावाfile photo
Published on: 
Updated on: 

Menace of stray dogs in Ambad; 15 people bitten

अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, दररोज नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. शहरातील विविध भागांत १५ ते २० कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील तब्बल १५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती - समोर आली आहे.

Stray dogs news
Matsyodari Devi Navratri 2026 : मत्स्योदरी देवी यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

शहरातील नाईकवाडी, मोडला मोहल्ला, पठाण मोहल्ला, जुने पोलीस स्टेशन परिसर, कादरी कॉलनी, जीपीसी बँकेमागील भाग, मटण मार्केट आणि आठवडी बाजार परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भागांसह शहरातील अनेक ठिकाणी कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसतात. नागरिकांना एकटे पाहून कुत्र्यांकडून हल्ले करण्याचे प्रकारही वारंवार घडत असल्याने लहान मुलांना घराबाहेर पाठवताना पालकांना चिंता वाटत आहे.

या समस्येबाबत काही नागरिकांनी संबंधित नगरसेवकांच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी एका नगरसेविकेच्या नातेवाइकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटनाही घडली आहे.

Stray dogs news
Crime News : पिन टिपून महिलेच्या खात्यातून ४० हजार लांबवले

नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, अंबड शहरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अंबड उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात कुत्रा चावल्यामुळे ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना ३४३ लींचे डोस देण्यात आले. ऑगस्ट महिन्यात ७९ रुग्णांची नोंद झाली असून, ३४४ डोस देण्यात आले. जुलै महिन्यात ४९ रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि ४४९ डोस देण्यात आले.
- डॉ. गोरख सुरमवाड, वैद्यकीय अधीक्षक, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news