Crime News : पिन टिपून महिलेच्या खात्यातून ४० हजार लांबवले

एटीएमवर नजर चुकवून नागरिकाची फसवणूक
Crime News
Crime News : पिन टिपून महिलेच्या खात्यातून ४० हजार लांबवलेfile photo
Published on: 
Updated on: 

₹40,000 siphoned off from woman's account after obtaining PIN

जालना, पुढारी वृत्तसेवाः पैशांचे ट्रान्झेक्शन करत असताना नजर चुकवून एटीएम कार्ड बदलल्याची आणि खात्यातील ४० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना जालना शहरात घडली आहे.

Crime News
Jalna Drought : मायक्रो फायनान्सच्या कर्ज हप्त्यांना एक वर्षाची स्थगिती द्या

फिर्यादी कविता संदीप शिंदे (रा. व्यंकटेश नगर, जालना) या बुधवार, दि. ७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे ३५ ते ४५ वयोगटातील एक अनोळखी इसम उभा होता. त्यांनी २० हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन केले, त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांचा एटीएमचा पिन पाहून घेतला.

Crime News
Matsyodari Devi Navratri 2026 : मत्स्योदरी देवी यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

त्यानंतर पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ट्रान्झेक्शन झाले नाही. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या त्या अनोळखी इसमाने "इंटरनॅशनलचे ऑप्शन चॉईस करा, पैसे निघतील" अशी बतावणी केली. घरी परतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आरपी रोड येथील एटीएममधून १० हजार रुपयांचे दोन वेळा असे एकूण २० हजार रुपये निघाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news