Matsyodari Devi Navratri 2026 : मत्स्योदरी देवी यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

वाढत्या उष्णतेमुळे दर्शन रांगांमध्ये मंडप आणि पाण्याचे फवारे; पोलिसांचा चोख बंदोबस्त
Matsyodari Devi Temple
Matsyodari Devi Templepudhari photo
Published on: 
Updated on: 

राजेंद्र कळकटे

अंबड : मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवार (दि.११) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर संस्थान प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील सुरक्षेसाठी तब्बल ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे यात्रेतील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार असून, यंदाची वाढती उष्णता लक्षात घेता दर्शन रांगांमध्ये मंडप आणि पाण्याचे फवारे (फोगर) लावण्यात आले आहेत.

यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि.१०) रोजी मत्स्योदरी देवी मंदिराच्या सभागृहात विविध शासकीय यंत्रणांची बैठक आणि पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार सोमेश मोहिते, पोलिस निरीक्षक संतोष घोडके, वीज वितरण कंपनीचे शहर अभियंता लक्ष्मण पुंडे, संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे, विश्वस्त गीताविलास खुंटेफळकर आदी उपस्थित होते.

Matsyodari Devi Temple
Sujat Ambedkar MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात

दरवर्षी भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने दर्शनासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगा आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर मंडप उभारण्यात आले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी मंडप परिसरात पाण्याचे बारीक फवारे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. मंदिर परिसरात दोन पोलिस चौक्या उभारण्यात येणार असून, फिरते पोलिस पथक, साध्या वेशातील पोलिस आणि महिला पोलिस तैनात राहणार आहेत. अंबड पोलिसांसह जिल्हास्तरावरून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला असून, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही पाचारण करण्यात आली आहे.

तेरा पोलिस अधिकारी बंदोबस्तात लावण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे, यासाठी अंबड येथील आयटीआय राष्ट्रीय सेवा योजनेचे ७० विद्यार्थी दर्शन रांगा व्यवस्थापनासाठी सेवा देणार आहेत. एसआरजे स्टील कंपनीच्या वतीने या विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचे गणवेश देण्यात आले आहेत.

Matsyodari Devi Temple
Sangli District Bank Election : खानापूर-आटपाडीत आघाडीचा शिवसेनेला 'बाय'

आकर्षक रोषणाई

मंदिर परिसरात आकर्षक स्वयंचलित विद्युत रोषणाई आणि संगीतमय सजावट करण्यात आली आहे. परिसरातील खेळणी व विविध साहित्यांच्या दुकानांचे वाटप पूर्ण झाले असून, संस्थानच्या वतीने सशुल्क पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे विशेष पथक, तर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कंपनीचे पथक तैनात करण्यात आले आहे. भाविकांना अडचण येऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news