Jalna News ; जालना जिल्ह्यात औषधी दुकाने बंद

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन, ऑनलाईन औषध विक्रीला आळा घालण्याची मागणी
Jalna News
Jalna News ; जालना जिल्ह्यात औषधी दुकाने बंदfile photo
Published on
Updated on

Medical Shops Closed in Jalna District

जालना, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत जालना शहरासह जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. बेकायदेशीररीत्या ऑनलाईन व फार्मसीच्या माध्यमातून होत असलेल्या औषध विक्रीला आळा घालावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. औषधी विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.

Jalna News
Jalna News : ऑनलाईन औषध विक्रीवर कारवाई करा; ३०० औषध विक्रेते संपात सहभागी

औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होत असल्याने चुकीची औषधे वापरण्याचा धोका वाढला आहे.

तसेच अधिकृत औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. या संदर्भात अनेकवेळा संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या, मात्र शासन व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

Jalna News
Drug addiction | अमली पदार्थांची मगरमिठी

त्यामुळे अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशव्यापी बंद पुकारल्याचे सांगण्यात आले. हा बंद १९ मेच्या मध्यरात्रीपासून २० मेच्या मध्यरात्रीपर्यंत पाळण्यात येत असून जालना जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते त्यात सहभागी झाले आहेत.

लोणार येथे कडकडीत बंद

अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या देशव्यापी बंदला लोणार तालुकयात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील वरिष्ठ केमिस्ट नंदू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार भूषण पाटील यांना निवदन देण्यात आले. यावेळी लोणार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी अफसर खान, कैलास बचाटे, अॅड. रिजवान जड्डा, सुमित बोरा, पंजाब शिंदे, चंदन दरोगा तसेच इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणार तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news