Jalna News : ऑनलाईन औषध विक्रीवर कारवाई करा; ३०० औषध विक्रेते संपात सहभागी

औषध विक्रेत्यांनी तहसीलदारांना दिले आपल्या मागण्यांचे निवेदन
Jalna News
Jalna News : ऑनलाईन औषध विक्रीवर कारवाई करा; ३०० औषध विक्रेते संपात सहभागीfile photo
Published on
Updated on

Take Action Against Online Sale of Medicines; 300 Medicine Vendors Join Strike

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत २० मे रोजी एक दिवसाचा बंद पुकारला होता. इंटरनेट फार्मसी आणि ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या कथित बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात हा बंद आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असून भोकरदन शहरातून ८० तर तालुक्यातून ३०० औषधी विक्रेत्यांनी या संपात सहभाग नोंदविला.

Jalna News
Pharmacitical Strike : जिल्ह्यातील ४ हजार मेडिकल बंद, रुग्णांचे हाल

यावेळी भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांना औषधी विक्रेते संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. संघटनेच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारच्या दिनांक २८ ऑगस्ट २०१८ तसेच २५ मार्च २०२० या अधिसूचनांच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून ग्राहकांच्या आरोग्याशीही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भावना संघटनेने व्यक्त केली आहे. भोकरदन तालुक्यातील सर्व औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले होते हा बंद१९ मे च्या मध्यरात्रीपासून २० मे च्या मध्यरात्रीपर्यंत औषध दुकाने बंद ठेवून पाळण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

Jalna News
Gevrai Chemists Protest |ऑनलाईन औषध विक्रीविरोधात गेवराईत मुक मोर्चा

मात्र बंद काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांसाठी औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे संघटनेने स्पष्ट केले होते. या निवेदनावर जालना जिल्हा उपाध्यक्ष किरण राजेंद्र बावस्कर भोकरदन तालुका अध्यक्ष अनिल श्यामराव दळवी, नामदेव रामचंद्र जगताप, नरेंद्र हरिशचंद्र आंधडे आणि शरद शिवाजी थोटे तालुक्यातील ज्येष्ठ केमिस्ट संजय पिसे गणेश दळवी रवी बावस्कर विजय लोखंडे विजय भिसे विजय गिरणारे विष्णू बर्डे व इतर केमिस्ट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा

या संदर्भात अनेक वेळा संबंधित मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शासनाकडे निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. मात्र शासन आणि प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news