मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक : मनोज जरांगे

अंतरवाली सराटी येथे जरांगेंचा मोठा आरोप
Manoj Jarange News
बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या आरोपावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगेंची टीका Pudhari File Photo

वडीगोद्री , पुढारी वृत्तसेवा : आपल्या लोकांना उत्तर द्यायचं सुद्धा मला वाईट वाटतं. मराठा समाजात एवढ्या अभ्यासकांनी जन्म घेतला आहे, असं वाटतंय की सरकार पक्षानेच हे लोक पेरले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय?, अशी शंका येते. यांची पार्श्वभूमी बघितली, तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, अशी टीका बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या आरोपावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आज (दि.५) माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

Manoj Jarange News
मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये; उद्यापासून करणार मराठा जनजागृती

Summary

  • बाळासाहेब सराटे यांच्या आरोपावर जरांगेंची टीका

  • आपल्या लोकांना उत्तर द्यायचं सुद्धा मला वाईट वाटतं.

  • तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, की काय

Manoj Jarange News
Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

सगेसोयर्‍यांची मागणी फक्त जरांगे पाटील करत आहे. ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणत्या कायदे तज्ञांनी घातली, माहिती नाही, असे बाळासाहेब सराटे म्हणाले होते. यावर जरांगे यांनी उत्तर दिले आहे.

Manoj Jarange News
Maratha Reservation : शंभुराज देसाई आमचा प्रश्न निकालात काढतील : मनोज जरांगे

मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी

यावर मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात. तेव्हा गोड लागलं. आम्ही तुम्हाला चर्चेला पाठवलं, तेव्हा ही गोड लागलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगले आहे. कशाला ते 16 टक्के आरक्षण चॅलेंज केल गेलं. मग मराठा समाजाला व मला ढ समजता का. तुम्हाला मला या आरक्षण लढ्यातून लांब काढायचं का? जाऊ का मी बाजूला? सरकारने तुम्हाला आमिष दाखवले असेल. त्याशिवाय तुम्ही नाही बोलू शकत. अजूनही वेळ गेलेली नाही. मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news