Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

अंतरवाली सराटी गावात दोनदा ड्रोनद्वारे रेकी
Maratha Reservation Manoj Jarange news
मनोज जरांगे यांची सुरक्षा वाढवण्यात आलीFile Photo

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलिस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलिस अंमलदारही नेमले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलिस पथक अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्यांनी पाहणी केली असता पोलिस पथकास ड्रोन आढळून आले नाही. तथापि, याबाबत संशयास्पद वाटणार्‍या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके पोलिस अधीक्षकांनी तयार केली असून, चौकशी सुरू आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतरवाली सराटी येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस प्रशासनाकडून प्राप्त करून त्याबाबत सभागृहास अवगत करण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी सभागृहास दिले होते. त्यानुसार त्यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news