Maratha Reservation : गेवराई बाजार येथे मराठा समाजाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा; तहसील प्रशासनाने स्वीकारले निवेदन
Maratha Reservation
Maratha Reservation : गेवराई बाजार येथे मराठा समाजाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनfile photo
Published on
Updated on

Maratha community stages protest by climbing a water tank at Georai market

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे बुधवार, दि. ९ रोजी मराठा समाजाच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी सरकारविरोधात घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

Maratha Reservation
Jarange Patil : जरांगे यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत

गावातील पाण्याच्या टाकीवर चढून करण्यात आलेल्या या आंदोलनाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. समाजबांधवांनी एकजुटीने घोषणा देत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी गेवराई बाजार येथे जाऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.

Maratha Reservation
Bhimpark : मनपा : सर्वसाधारण सभेत गाजणार 'भीमपार्क'चा मुद्दा

तसेच त्यांचे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन दिले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी सांगितले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news