Jalna Crime : मंठा पोलिसांकडून खून प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद

सासरा व जावयांनी मिळुन घेतला बदला
Mantha murder case
मंठाः पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पात इसमाच्या खूनप्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी (छायाः बालाजी कुलकर्णी )
Published on
Updated on

मंठा : मंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटोदा शिवारात असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.या खुनाचा छडा लावण्यात मंठा पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.

मंठा तालुक्यातील पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात किसन बाबासाहेब आवचार यांचा खुन करुन मृतदेह फेकुन देण्यात आला होता.या प्रकरणातील आरोपीतांचा पोलिसांनी शोध घेतला असता सदर मयतास त्याचा चुलता विश्वनाथ साहेबराव आवचार (रा. विडोळी ता. मंठा जि. जालना), व त्यांचे जावई राजु गंगाधर धुमाळ( रा.आदर्श कॉलणी परतुर ) यांनी किसन अवचार यांचा खुन करून त्यास निन्म दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामध्ये टाकुन दिल्याचे तपासात समोर आले. विश्वनाथ अवचार यांच्या मुलाचा 2007 मध्ये अशाच पध्दतीने खुन करण्यात आला होता. त्याचा बदला म्हणुन सासरा व जावयांनी मिळुन बदला घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे.

Mantha murder case
Sangli Crime : पलूसमधील खुनाचा छडा; अल्पवयीन संशयित ताब्यात

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांच्या फिर्यादीवरून 27 मार्च रोजी मंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास, फिंगरप्रिंट व इतर पुराव्यांच्या आधारे मृताची ओळख किसन बाबासाहेब आवचार (रा. विडोळी) अशी पटवली होती. तपासात किसन बाबासाहेब आवचार याचा शेतात खुन करुन मृतदेह डाव्या कालव्यात फेकुन दिल्याचे दोन्ही आरोपींनी कबुल केल्याचे समजते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलिसांनी केली. पोलिसांनी खुनाचा छडा लावल्याने त्यांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Mantha murder case
अनोळखी महिलेच्या क्रूर हत्येचा उलगडा; पतीसह दोन आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news