Kasturba Gandhi Balika Vidyalaya : निधी प्राप्त होऊनही वेतन रखडले

Teacher salary pending : जूनपासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित
Teacher salary pending
Teacher salary pendingpudhari photo
Published on
Updated on

मंठा : कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जून २०२६ पासूनचे वेतन अद्याप प्रलंबित आहे. वेतनासाठी निधी आता प्राप्त झाला असतानाही नवीन एसएनए स्पर्श प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे वेतन वितरणास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

कस्तुरबा गांधी निवासी विद्यालये ही निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थिनींच्या भोजन, निवास, दैनंदिन गरजा व निर्वाहासाठी आवश्यक असलेला खर्च नियमितपणे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र निधीअभावी विद्यार्थिनींच्या निर्वाहाशी संबंधित दैनंदिन व्यवस्थेलाही अडचणी निर्माण होत असल्याची बाब समोर येत आहे.

Teacher salary pending
Ganesh idol price hike : गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

एकीकडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जूनपासून वेतन रखडले आहे, तर दुसरीकडे निवासी विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजांसाठी निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या निवास व निर्वाह व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

निधी प्राप्त झालेला असताना केवळ नवीन एसएनए स्पर्श प्रणालीतील अडचणींमुळे वेतन थांबविण्याऐवजी, एसएनए स्पर्श मधील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत जुन्या पीएफएमएस प्रणालीद्वारे तातडीने जूनपासूनचे प्रलंबित वेतन अदा करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील विद्यार्थिनींच्या निर्वाहासाठी आवश्यक निधी नियमित व वेळेत उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून निवासी शाळेतील भोजन, निवास आणि दैनंदिन व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Teacher salary pending
leopard cage trap : वरखेडमध्ये बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास

शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन आणि विद्यार्थिनींच्या निर्वाहासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

आर्थिक संकट

सध्या सार्वजनिक उत्सवांचा काळ सुरू असून, अनेक महिने वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. “वेतनाशिवाय सार्वजनिक उत्सव कसे साजरे करायचे?” असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news