Ganesh idol price hike : गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

गणेश मंडळांपुढे आर्थिक संकट : मोठ्या गणेश मूर्तींना पसंती, इतर साहित्यांतही झाली वाढ
Ganesh idol price hike
पिंपळगाव रेणुकाई : गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरविताना मूर्तिकार. pudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई , संदीप देशमुख : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. येत्या सोमवारी गणरायाचे आगमन होणार असल्याने गावातील मूर्तिकार मूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र यंदा मूर्तींच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याने गणेश मंडळांसमोर आर्थिक अडचणीचे संकट उभे राहिले आहे.

पिंपळगाव रेणुकाई हे भोकरदन तालुक्यातील मूर्तिकलेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील मूर्तिकार गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. दीड फुटापासून ते दहा फुटांपर्यंतच्या शेकडो मूर्ती येथे तयार होत आहेत. गावासह तालुक्यातील अनेक गणेश मंडळे येथूनच मूर्ती खरेदी करतात. यंदा मूर्ती महाग होण्यामागे अनेक कारणे आहेत.

Ganesh idol price hike
Chatrapati Sambhajinagar News : नाचनवेल आरोग्य केंद्रात तक्रारींचा पाढा

प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, शाडू माती आणि सजावटीच्या साहित्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सोबतच मजुरीचा खर्चही वाढला आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती बनवण्याचा खर्च अधिक येत आहे. त्यामुळे नाईलाजाने दरवाढ करावी लागली. गेल्या वर्षी पाच फुटाची मूर्ती १५ हजार रुपयांना मिळत होती, ती यंदा ८ हजार रुपयांवर गेली आहे.

या दरवाढीचा फटका सर्वात जास्त सार्वजनिक गणेश मंडळांना बसत आहे. गणेश मंडळाचे वर्गणीतून मंडळ चालते. पण मूर्ती, मंडप, लाईट आणि वाद्य यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे यंदा बजेट कोलमडले आहे. काही मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचा विचार सुरू केला आहे.

Ganesh idol price hike
MSRTC special bus service : एसटी गेली कोकणात, ग्रामीण प्रवासी खासगी वाहनांत !

तरीही भाविकांचा उत्साह कायम आहे. मूर्तिकारांच्या शाळेत नागरिक मूर्ती बुक करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे पिंपळगाव रेणुकाई सज्ज झाले आहे.

यावर्षी सर्वच वस्तूचे भाव वाढ झाली आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती ३० टाक्याने वाढ झाली असल्यामुळे साहित्यही खूप महाग झाले आहे. त्यामुळे कलर व इतर साहित्य जास्त महाग भेटत असल्याने मूर्तीला नाही लागण जास्त महाग विकावा लागत आहे.

दिलीप सिल्लोडे, मूर्तिकार

मूर्तीसह इतर साहित्यही खूप महाग झाले आहे. त्यामुळे मंडळाला दरवर्षी पेक्षा जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे आम्ही मंडळाच्या सदस्यांचे वर्गणीमध्ये वाढ केली आहे.

रामेश्वर देशमुख, अध्यक्ष ओम गणेश मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news