Jarange Patil : भुजबळ वातावरण बिघडवत आहेत

भुजबळच्या नादी लागू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
Jarange Patil
Jarange Patil : भुजबळ वातावरण बिघडवत आहेत File Photo
Published on
Updated on

Manoj Jarange Patil's criticism of Bhujbal

वडीगोद्री : बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे. यात विशिष्ट जातीचे लोक जमवले गेले आहेत. बाकी यांना काही करायचे नाही. ते कुठेही उतरले तरी काही फरक पडणार नाही. त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली आहे. छगन भुजबळ वातावरण बिघडवत आहे. टाळ्या वाजवण्यासाठी तो तिथे आला आहे. भुजबळच्या नादी लागू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Jarange Patil
Heavy Rainfall Subsidy : अतिवृष्टी अनुदानासाठी ४२१ कोटींचा प्रस्ताव सादर

बीड येथील ओबीसी मेळाव्यानंतर जरांगे माध्यमाशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा किती आहे आम्हाला माहीत आहे. त्याच्या आकडेमोडीवर कोण लक्ष देते. जीआर रद्द करण्यासाठी तुम्ही दहशत निर्माण करत असाल तर मराठ्यांनासुद्धा एकत्र येऊन तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल. हीच पवित्र भूमी राज्याला दिशादर्शक होऊ शकते. याचे दंगली घडवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. त्याची आता अक्कलदाड पडली आहे. हा ओबीसी नेत्यांना चक्रव्यूहात घेणार. तुम्ही कितीही दडपण आणा, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. धनंजय मुंडे यांच्या चष्मा डायलॉगवर बोलताना जरांगे म्हणाले की, तुझा चष्मा तुलाच ठेव. तो रक्ताने भरलेला आहे.

Jarange Patil
Jalna Crime News : पारध पोलिसांनी पकडले गोवंश मांस, १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, फडणवीस यांनी मराठ्यांचे मन जिंकले आहे. फडणवीस यांच्या लक्षात आले आहे, त्याची अवकाद किती आहे. त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झाली आहे. फडणवीस, विखे, शिंदे, अजित पवार यांना त्यांना बदनाम करायचे आहे. त्याने अजित पवार यांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. याच्या सभेतून लक्षात आले आहे. त्यामुळे पवार यांनी याला बाजूला करावे. अजित पवारांनी बीड जिल्हा दुसऱ्याच्या हातात द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news