

Paradh police seized beef
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी धावडा ते वालसावंगी रोडवरील भुयारेश्वर फाट्याजवळ रिक्षातून गोमांस घेऊन जाणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील तीन जणांना पकडून त्यांच्या ताब्यातून गोमांस व लोडिंग रिक्षा असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पारध पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुनील सुखदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, धावडा ते वालसावंगी जाणाऱ्या रोडवरील भुयारेश्वर फाटाजवळ संशयित ईरफान शब्बीर कुरेशी, मसुद ऊर्फ लाला मुसा कुरेशी व रईस रशीद कुरेशी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला शिवाणा, ता. सिल्लोड) यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार जायभाय हे करीत आहेत.
पारध पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक करणत येत आहे. कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.