Manoj Jarange Patil Mumbai March Route: मनोज जरांगे पाटलांची 'चलो मुंबई'ची हाक... मार्ग कसा असणार? मोर्चा आडवला तर काय?

Manoj Jarange Patil Mumbai March Update
Manoj Jarange Patil Mumbai March Updatepudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Mumbai March Route: अंतरवाली सराटीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकार मागण्या मान्य करत नाही म्हटल्यावर चलो मुंबईचा नारा दिला आहे. त्यांनी अंतरवालीतून राज्यातील सर्व मराठा बांधवांना आवाहन करत आता पुढचं उपोषण हे मुंबईत होणार अशी घोषणा केली.

(Manoj Jarange Patil Mumbai Hunger Strike Update)

Manoj Jarange Patil Mumbai March Update
Manoj Jarange Patil: 'ही अंतिम आणि शेवटची लढाई', जरांगे पाटलांची मोठी घोषणा; मुंबईत जाण्याचा निर्णय फायनल

मनोज जरांगेंनी सांगितली मार्चची SOP

मनोज जरांगे पाटील यांनी हे मुंबईतील आंदोलन कसे असेल अन् राज्यातील मराठा बांधवांनी त्याला कशा प्रकारे साथ द्यायची आहे याची एकप्रकारे एसओपीच जाहीर केली. त्यांनी न्याय देवता आपल्या बाजूने आहे. त्यामुळं आपण शांततेतच आंदोलन करायचं असा सुचना वजा इशारा दिला आहे. त्यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग देखील सांगितला.

Manoj Jarange Patil Mumbai March Update
Manoj Jarange-Patil : मनोज जरांगेंविरुद्ध आत थेट 'ED'कडे तक्रार! जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई जाण्याचा मार्ग खालील प्रमाणे

15 सप्टेंबर रोजी

- अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघणार व पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार आहे.

16 सप्टेंबर

- 16 तारखेला सकाळी पाटोद्यातून पुढच्या प्रवासाठी निघणार. व दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे होणार आहे.

17 सप्टेंबर

- सकाळी श्रीगोंदा येथून पुढील प्रवासाठी निघणार.तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे होणार आहे. 17 रोजी मुक्काम होईल.

18 सप्टेंबर

- हडपसर येथून सकाळी रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरने येथे होईल (सध्या खोपोली फायनल) 18 रात्री मुक्काम व पुढे.

19 सप्टेंबर

- खोपोली येथील मुक्कामानंतर आझाद मैदान येथे जाऊन सकाळी 10 वाजे पासून आमरण उपोषण सुरू होईल...

Manoj Jarange Patil Mumbai March Update
Manoj Jarange Patil : "आम्ही मराठ्यांच्‍या लेकरांपुढे सणवार बघत नाही" : मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

आंदोलन शांततेतच होणार

मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन शांततेतच होणार आहे यावर सतत भर दिला. तसेच त्यांनी जर दगडफेक किंवा काही आगळीक झाली तर आंदोलन तिथंच स्थगित करण्यात येईल असं देखील सांगितलं. याचबरोबर जर पोलिसांनी आंदोलकांना आडवलं तर काय करायचं याचं मार्गदर्शन केलं.

Manoj Jarange Patil Mumbai March Update
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या आंदोलनस्थळी सरकारबाबत गैरसमज पसरवले जात आहेत : मंत्री उदय सामंत

गाडी आडवलीच तर काय?

ते म्हणाले की, जर एखाद्या पोलिसानं तुम्हाला किंवा तुमची गाडी अडवली तर तिथंच थांबायचं गाडी लावायची आणि तिथंच झोपून जायचं. दुसरा मार्ग शोधायचा डोक्यानं चालायचं. कोणी खुन्नस दिली तर त्याला उत्तर देत बसू नका. जे मुंबईत येणार नाही त्यांनी वाटेवर थांबून आशीर्वाद द्या. चिखलातून वाट काढा मात्र लोकांना आशीर्वाद देण्यासाठी या असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news