Manoj Jarange Patil : जूनपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करा; अन्यथा उपोषण

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange-Patil
मनोज जरांगे- पाटीलFile Photo
Published on
Updated on

वडीगोद्री : मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला जूनच्या आत कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.

अंतरवाली सराटी येथे बुधवारी मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. माझी सहनशिलता संपू देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

Manoj Jarange-Patil
Heart attack during family function | दुर्दैवी ! लाडक्या भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा हृदयविकाराने मृत्यू

हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याने जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. जूनपासून हैदराबाद व सातारा गॅझेटियर लागू होऊन मराठा समाज आरक्षणात न गेल्यास अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange-Patil
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील मका खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याचे निर्देश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news