Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही

मनोज जरांगे यांचे फडणवीस, शिंदेंना आव्हान; क्लिप प्रकरणात मोदींनीही लक्ष घालण्याची मागणी
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilpudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि ते बंद पाडण्यासाठी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप पुढे करून कट रचण्यात आल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सत्य बाहेर आणावे. त्याचा छडा लागेपर्यंत आपण हा विषय सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी शनिवारी (दि.२४) अंकुशनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कथित ५०० कोटींच्‍या ऑडिओ क्‍लिपप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले की, “मला बदनाम करण्याचा घाट का घातला? मराठा आंदोलन बंद पाडण्यासाठी माझ्यावर संकटे का आणली जात आहेत? शेतकऱ्यांचा विषय हातात घेतल्यामुळे मला संपवण्यापर्यंत काही लोक का गेले?” असे सवाल जरांगे यांनी उपस्थित केले. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य समोर आणण्याची जबाबदारी फडणवीस आणि शिंदे यांनी घ्यावी. त्यांच्या पक्षातील कोणाचा सहभाग आढळला, तरी त्याला पाठीशी घालू नये, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil
Tiger Shroff Flat Sale: टायगरने विकला फ्‍लॅट; खार पश्चिमेतील आलिशान फ्लॅटचा ९ कोटींचा व्यवहार

रामदास कदम, उदय सामंत, प्रसाद लाड यांच्याकडे बोट

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे यांनी रामदास कदम, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले. रामदास कदम यांनी क्लिप बाहेर काढल्याचा आरोप करत फडणवीस आणि शिंदे यांनी त्यांच्याकडे याबाबत विचारणा करावी, असे ते म्हणाले. प्रसाद लाड यांनी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य जाणून घ्यावे. “मित्रत्वापोटी तपास थांबवण्याची वेळ येऊ देऊ नये. मी त्यांना सांगतो की क्लिप खरी आहे,” असा दावाही जरांगे यांनी केला. संजय राऊत यांनी क्लिप तयार केली असावी का, या विचारलेल्‍या प्रश्नावर त्यांनी कोणत्याही दावे-प्रतिदाव्यांपेक्षा सत्य समोर येणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

भाजप-शिवसेनेने प्रतिनिधी पाठवावा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या माहितीशिवाय भाजप- सेनेमधील काही लोक असे करत असतील, तर तो दोन्‍ही पक्षासाठी धोक्याचा विषय आहे. त्‍यामुळे त्यांनी याची चौकशी करावी, असे सांगत जरांगे यांनी उदय सामंत किंवा शंभूराज देसाई यांना चर्चेसाठी पाठवावे, तसेच भाजपनेही प्रतिनिधी पाठवावा, अशी सूचना केली. संबंधित व्यक्तींच्या जीविताला धोका होणार नाही, अशी हमी फडणवीस आणि शिंदे यांनी माध्यमांसमोर द्यावी. त्यानंतर आपण अधिक माहिती देण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्‍पष्ट केले.

Manoj Jarange Patil
Sea Buckthorn : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं 'लडाखच्या सोन्या'चं रहस्य; 'हे' कोणत सुपरफूड?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news