Manoj Jarange : मनोज जरांगेंनी पुन्हा उपचार घेणं सोडलं; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

सरकार सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची जरांगे यांची भूमिका
Manoj Jarange Patil hunger strike
Manoj Jarange Patil hunger strikepudhari photo
Published on
Updated on

Manoj Jarange has once again stopped undergoing medical treatment; all eyes are on the government's stance

वडिगोद्री : पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा शनिवारी आठवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून जोपर्यंत सरकार सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

Manoj Jarange Patil hunger strike
Jalna Crime : चोरी गेलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत; हसनाबाद पोलिसांची कारवाई

दरम्यान, मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून उपचार घेणे पुन्हा सोडले असल्याची माहिती समोर येत आहे. पाणी आणि सलाईन तसेच तपासणीदेखील त्यांनी बंद केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आता काही घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. मागण्याची अंमलबजावणी करा त्यानंतरच उपचार घेणार, असा मनोज जरांगे यांचा पवित्रा आहे.

सरकार 58 लाख नोंदी सुरू करतो म्हणाले. पण अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही. हैदराबाद गॅझेटचं काम सुरू केलं नाही. गावात दवंड्या पिटतो म्हणाले की, ते काही केलं नाही. हैदराबाद गॅझेटनुसार व्हॅलिडिटी द्यायची असली तर 2012 च्या कायद्यात जातपडताळणी कायद्यात हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री यांना बोलतो, असं शिष्टमंडळ म्हणाले होते.

Manoj Jarange Patil hunger strike
Cattle smuggling : गोवंशाची अवैध वाहतूक; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मात्र अद्याप शिष्टमंडळ का बोलले नाही? हैदराबाद गॅझेटच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न मिटेल, असे जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थली दाखल झाले असताना मनोज जरांगे यांनी तपासणी नाकारली असल्याचे पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news