Manoj Jarange Patil : ‘गोड गोड बोलून आमचे वर्ष वाया घालविले’; विखे पाटलांवर जरांगेंची जोरदार टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंचा विखे पाटलांवर हल्लाबोल
Maratha reservation protest
Manoj Jarange Patilpudhari photo
Published on
Updated on

वडीगोद्री : जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचे सर्वाधिक वाटोळे केले आहे. त्यांनी गोड गोड बोलून आमचे वर्ष वाया घालविले. फडणवीस यांचे गुणगाण गाणे आणि शरद पवारांनी काहीच केले नाही, असे म्हणण्यापलीकडे त्यांनी काही काम केले नाही, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.

विखे यांनी केले. त्यावर जरांगे यांच्या उपोषणाचा मंगळवारी अकरावा दिवस होता. जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही, असे वक्तव्य संताप व्यक्त करताना अरांगे यांनी विखे यांच्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी त्यांना उखडून फेकण्याचा इशारा दिला. सरकार म्हणते आहे की आमच्याकडे पर्याय नाही. कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, बावनकुळेंचे ऐकणे हेच पर्याय आहेत का? सातारा संस्थानचे गॅझेट, हैदराबादप्रमाणे नोंदी याविषयाबाबत अनुकूल निर्णय झाले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या काळात आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण मिळाले, विखे-फडणवीसांनी काय केले? असा सवाल त्यांनी विचारला.

Maratha reservation protest
Maratha reservation protest : सरकार-जरागेंमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे

वैयक्तिक मंत्रिपदावर असताना तुम्हाला कुणी काही बोलणार नाही. तुमच्याकडे जोपर्यंत मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळचा शिक्का आहे, तोपर्यंत तुम्हाला मराठ्यांचे कामे करावे लागणार आहे. तुम्ही सपशेल अपयशी ठरला आणि तुम्ही मराठ्यांशी दगाफटका केला. आम्ही अंतरवालीत तुम्हाला बोलावित नाही, असे ते म्हणाले.

मुंबईवर ठाम

मला सांगितले होते की, विखे-पाटील दगाबाज आहेत. विखे सारखे उपसमितीचे अध्यक्ष असले तर मराठ्यांचे वाटोळेच होणार. विखेंना यापासून पळ काढता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण देत नाही. ते काही करत नाहीत फक्त दिखावा आहे, मला जेलमध्ये टाकायचे तर टाका. १२ तारखेला बैठक होणार असून, मुंबईला जाणार हे नक्की आहे, असे जरांगे यांनी सांगितले.

Maratha reservation protest
Jio World Plaza Security Breach: बनावट ओळखपत्र अन् बंदूक, जिओ वर्ल्डमध्ये घुसखोरी; दोघा जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news