साखरेच्या घाऊक साठवणुकीवर मर्यादा

केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दि. १९ रोजी एक आदेश निर्गमित केला आहे.
Sugar Prices
साखरेच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

Limit on wholesale storage of sugar

जालना, पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दि. १९ रोजी एक आदेश निर्गमित केला आहे. हा आदेश १ सप्टेबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागू राहणार आहे. या आदेशानुसार दरमहा १० मे.टन किंवा त्यापेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या घाऊक उपभोक्ताकडे १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साखरेचा साठा ठेवता येणार नाही.

Sugar Prices
Jalna News : सण- उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

घाऊक उपभोक्तामध्ये कन्फेक्शनरी उत्पादक, शीतपेय उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग, मिठाई विक्रेते तसेच मागील एका वर्षातील चालू महिन्याव्यतिरिक्त कालावधीचा विचार करता दरमहा किमान १० मे. टन साखर वापरणारे अन्य संस्थात्मक खरेदीदार यांचा समावेश आहे.

Sugar Prices
Ganeshotsav 2026 : विसर्जन कुंडाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी

साखर कारखान्यांकडून घाऊक उपभोक्ताला थेट अथवा दलालामार्फत करण्यात येणाऱ्या साखर विक्रीची मासिक मात्रा संबंधित विक्रेता, खरेदीदाराने दाखल केलेल्या जीएसटी रिटर्नसच्या आधारे पडताळण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी, घाऊक विक्रेते, घाऊक उपभोक्ता तसेच संबंधित साखर कारखान्यांना केंद्र शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना आहे. सर्व संबंधितांनी केंद्र शासनाच्या आदेशातील साखर साठा मर्यादेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news