Jalna News : जाफराबाद गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्लॅबला गळती

जीर्ण इमारतीतील गज पडले उघडे, पाणी झिरपल्याने इमारतीची दुरवस्था
Jalna News
Jalna News : जाफराबाद गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या स्लॅबला गळतीfile photo
Published on
Updated on

Leakage in the slab of the Jaffrabad Group Education Officer's office

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबला ठिकठिकाणी गळती लागली आहे. स्लॅबचा सिमेंटचा थर निघून गेल्याने त्यातील लोखंडी गज उघडे पडले आहेत. पावसाळ्यात छतामधून पाणी झिरपत असल्याने कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत आहे.

Jalna News
Crime News : वडिलांशी का भांडता विचारल्याचा राग अनावर; काकाने लाकडी दांड्याने डोके फोडले

इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी तडे गेले असून, सिमेंटचा थर निघाल्यामुळे लोखंडी गज स्पष्टपणे दिसून येत आहेत. सततच्या पावसामुळे स्लॅबमध्ये ओलावा निर्माण होत असून, यामुळे इमारतीच्या मजबुतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळीच दुरुस्ती न केल्यास स्लॅबचा काही भाग कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तालुक्यातील विविध शाळांशी संबंधित महत्त्वाची शासकीय कागदपत्रे व नोंदी अलमाऱ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, स्लॅबमधून पाणी गळत असल्याने या कागदपत्रांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून कागदपत्रांचे संरक्षण करण्यासाठी अलमाऱ्यांवर कापड टाकण्याची वेळ आली आहे. छताला गळती असताना कार्यालयातील विद्युत पंखे व वायरिंगचा वापर करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये करंट उतरण्याची भीती आहे. पाणी आणि विद्युत व्यवस्था यांचा संपर्क आल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरूस्तीची मागणी होत आहे.

Jalna News
Jalna Crime News : 'इथे झोका बांधू नको, लेकरांना इजा होईल' सांगणे पडले महागात

दुरुस्तीची मागणी

या कार्यालयात शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी नागरिकांची नियमित वर्दळ असते. त्यामुळे इमारतीची सध्याची अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी. स्लॅबची तांत्रिक तपासणी, गळती बंद करणे, उघडे पडलेले गज दुरुस्त करणे आणि विद्युत वायरिंग सुरक्षित करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news