Jalna Crime News : 'इथे झोका बांधू नको, लेकरांना इजा होईल' सांगणे पडले महागात

धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील उंबरखेड येथे घडली आहे.
jalna crime news
Jalna Newspudhari photo
Published on
Updated on

Farmer and his family members assaulted by a gang of 10 people

जालना, पुढारी वृत्तसेवाः जनावरांच्या सुरक्षेसाठी व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी झाडाला झोका बांधू नका असे समजावून सांगणाऱ्या एका ५१ वर्षीय शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबीयांना १० जणांच्या टोळक्याने अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील उंबरखेड येथे घडली आहे.

jalna crime news
Crime News : वडिलांशी का भांडता विचारल्याचा राग अनावर; काकाने लाकडी दांड्याने डोके फोडले

फिर्यादी रमेश परमेश्वर होलगे (वय ५१ वर्षे, व्यवसाय शेती, रा. उंबरखेड, ता. भोकरदन) हे रविवार, दि. १६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गावातील गिरणीजवळ उभे होते. त्यावेळी रमेश होलगे यांनी सुनीलला येथे झोका बांधू नको, आमचे जनावरे बांधलेले असतात, जनावरांपासून लेकरांना इजा होऊ शकते, असे समजावून सांगितले.

परंतु, समजावून सांगण्याचा प्रचंड राग आल्याने सुनील होलगे याने रमेश यांना आंधळ्या, तुझ्या बापाचे झाड व जागा आहे का?" असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचे नातेवाईक सुरेश परमेश्वर होलगे, अनिता सुरेश होलगे, चैतन राजू होलगे, मथुरा राजू होलगे, अर्जुन गणेश होलगे, विशाल विजय होलगे, हिराबाई गणेश होलगे, सतीश अनिल होलगे आणि अनिता विजय होलगे (सर्व रा. उंबरखेड, ता. भोकरदन) या १० जणांच्या टोळक्याने रमेश होलगे यांना घेरून बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये रमेश यांच्या छातीला गंभीर मार लागला.

jalna crime news
Jalna News : जिह्यातील अडीचशे कार्यालयात 'पॉश'ची अंमलबजावणी नाही !

वडिलांना वाचवा-वाचवा असा आवाज ऐकून त्यांचा मुलगा कृष्णा रमेश होलगे, दुसरा मुलगा दीपक रमेश होलगे आणि पत्नी इंदुबाई रमेश होलगे हे मध्यस्थी करण्यासाठी व सोडवण्यासाठी धावले. मात्र, संतापलेल्या टोळक्याने त्यांनाही सोडले नाही.

गावकऱ्यांनी केली मध्यस्थी

गावकऱ्यांनी तत्काळ मध्यस्थी करून सोडवासोडव केली. यानंतर जखमी रमेश होलगे, मुलगा कृष्णा व पत्नी इंदुबाई यांनी राजूर येथील सरकारी दवाखान्यात जाऊन तातडीने उपचार घेतले.

उपचार घेतल्यानंतर मंगळवार, दि. १८ रोजी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून हसनाबाद पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार गजानन बाबूराव काकड करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news