Leopard News : बिबट्याचा थरार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

शेतात सकाळी मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना बिबट्या दिसून आला.
Leopard News
Leopard News : बिबट्याचा थरार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंदfile photo
Published on
Updated on

Laborers who went to the field in the morning to harvest maize spotted a leopard

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गोदरी रोड परिसरात दिसून आलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे.

Leopard News
Leopard Capture | नादरपूर येथे बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

जुनेद सौदागर यांच्या शेतात सकाळी मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना बिबट्या दिसून आला. त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या वाळू देशमुख यांच्या जनावरांसाठी पेरलेल्या कटवाल (चाऱ्याच्या शेतात) जाऊन सुमारे पाच तास थांबून होता.

दरम्यान वनपरिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वनपरिमंडळ भोकरदन क्षेत्रातील संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जालना सुदाम मुंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर श्रीमती निता फुले यांच्या नेतृत्वाखाली वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोमळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या समन्वयातून रेस्क्यू टीमचे आशिष जोशी, दीपक वटाणे, वनपरिमंडळ अधिकारी जालना शाम यमगर, वनरक्षक बावने पांगरी आनंद वरशीळ, जाफराबादचे संभाजी हाटकर, माळेगावच्या सुनिता सुरशे, बदनापूरच्या रेखा दोनगहु, तसेच नारायण सोडगिर, महादेव कळमकर, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी, अनुप तडवी, मंगेश संपकाळ, पांडुरंग डोंगरे आदींच्या मदतीने करण्यात आली.

Leopard News
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बोकड, बकरी ठार

वनविभागाचे आवाहन

शेतात एकटे जाऊ नये वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ माहिती द्यावी अफवा पसरवू नयेत सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू असून, परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news