Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बोकड, बकरी ठार

तालुक्यातील चिकलठाण परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक बोकड व एक बकरी ठार
Leopard attack
Leopard attackPudhari
Published on
Updated on

Goat killed in leopard attack

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिकलठाण परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक बोकड व एक बकरी ठार झाली असून, कुत्रा गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिकलठाण येथील शेतकरी उत्तम साहेबराव चव्हाण यांच्या गट क्रमांक ३५२ मधील शेतात मंगळवारी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला.

Leopard attack
Sambhajinagar News : कुंजखेडा शिवारात वाळूमाफियांना चाप

या हल्ल्यात एक बोकड व एक बकरी ठार झाली असून घराजवळील कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनपरिमंडळ अधिकारी ए. जी. वाघ, वनरक्षक एस. बी. वाघ तसेच पशुवैद्यकीय अधिकारी बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.

Leopard attack
Devagiri Fort : देवगिरी किल्ला पुन्हा आगीच्या विळख्यात, दुर्मिळ वनस्पती, वन्यजीवांचे मोठे नुकसान

या वेळी उबाठा विभागप्रमुख कल्याण चव्हाण, दीपक चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल दळे, प्रवीण क्षीरसागर, बाबासाहेब चव्हाण, भागिनाथ मगर, योगेश्वर चव्हाण, संतोष चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, चिकलठाण परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणआहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news