

Krantijyoti Savitribai Phule's birth anniversary was celebrated with enthusiasm
जालना, पुढारी वृत्तसेवा समाजातील विशिष्ट घटकाचा रोष पत्करून स्त्रिवांसाठी साक्षरतेची बाट प्रकाशमान करणान्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवारी (दि. २) शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, विविध संघटना, सरकारी कार्यालये, राजकीय पर्धाच्या कार्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कायांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय, डोणगाव डोणगाव जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वावेळी सरपंच पूनम कुंडलिक घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी कुंडलिक घोडके, उपसरपंच मिलिंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य परशुराम रजाळे, बाबासाहेब पुंगळे, गंगाधर खरात, राजू घोडके, मनोज पिंपळे राजेंद्र अंभोरे, मिलिंद जाधव, रशीद मणियार, सुरेश पिंपळे, अमजद शेख, ग्रामसेवक आर आय मोगल अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेवक आदींची उपस्थिती होती.
नूतन विद्यालय, डोणगाव
डोणगाव जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील नुतन विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक परमेश्वर जगताप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक सुधाकर डोईफोडे यांची उपस्थिती होती. यावेळी सी शिक्षणाचे महत्व काच ते समजावून सांगितले. सूत्रसंचालन शिक्षक समीर सय्यद यांनी केले तर आभार कृष्ण चेके यांनी मानले.
राजर्षी शाहू विद्यालय, पारध
पारथ येथील मिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांख्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुलयाध्यापक विलास लोखंडे हे होते. यावेळी विद्यार्थिनी खुशी सुनील पूर्वे ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत तर विद्यार्थी गोपाल रमेश आल्हाट याने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे, मुख्याध्यापक विलास लोखंडे, उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, सहशिक्षक निलेश लोखंडे, ज्ञानेश्वर आल्हाट, सहशिक्षिका सोनाली कोळसे भागवत पानपाटील, गजानन लोखंडे आदीची उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी टेंभुर्णी: जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त मान्यवराच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले सार्वजनिक घनसावंगी येथील चाणक्य इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन करताना विद्यार्थिनी.
वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब अंभोरे व जिजाऊ ग्रामीण विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय लहाने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश डोईफोडे, गजानन नाडे, शेळके, मुख्याध्यापक संजय फलटणकर, गजानन वायाळ, अमोल तेलंगे, विनोद उबरहंडे, विशाल शिंगणे, बिनोद धवलिया, भागवत लहाने, बनिता बोडखे, रोहिणी सोळुंके, सविता बकाल, स्नेहल रिंडे अश्विनी दूनगह, सुनिता मोरे, समीना सय्यद, पूजा टेकाडे, शंकर सबडे, शंकर मोडेकर, विमल मदन यांची उपस्थिती होती. ऋषी महाराज आदर्श विद्यालय, बावणे पांगरी
डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील बावणे पांगरी येथील ऋषी महाराज आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य कृष्णा जाधव, उपप्राचार्य संदीप सोनुने यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, सुत्रसंचालन लक्ष्मी बावणे हिने केले, तर आभार शिक्षक नामदेव नवले यांनी मानले.
जनता विद्यालय, पारस्थ
पारध भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक प्रा. संग्राम देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका शर्मिला शिंदे, श्रीमती बिहार कदम, एम.एस. काळे, एल.एस. वानखेडे यांची उपस्थिती होती. मान्यवराच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पर्यवेक्षक महिंद्र लोखंडे, प्रा. नारायण पाटील, राजेंद्र देशमुख, एस.एच.बोर्डे, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे यांची उपस्थिती होती.
साई मॉडर्न इंग्लिश स्कूल, बदनापूर बदनापूर येथील साई मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला प्राचार्या जाधव मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक जाधव सर यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. चाणक्य इंग्लिश स्कूल, घनसावंगी घनसावंगी येथील चाणक्य इंग्लिश स्कूलमध्ये स्त्री शिक्षणाची आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागर आणि स्त्री सक्षमीकरणाचा संदेश पोहोचविण्यासाठी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. विद्यार्थिनींनी साकारलेली वेशभूषा केवळ सजावटीपुरती नसून, त्यांच्या कार्याची जाणीव करून देणारी होती, अशी प्रतिक्रिया शिक्षकवगांतून व्यक्त झाली. मुख्याध्यापिका मुक्ता सपाटे, शिक्षिका वैशाली पापुलवाड, इमराणा सय्यद, दिक्षा परिहार, श्रीदेवी कौशल, मंजुषा कोरडे, प्रांजल पुराणिक, तसेच शिक्षक सुरज कौशल, मुशरफ शेख, मानसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लेझिम पथकाने सर्वाचे वेधले लक्ष
भोकदन शहरातील अक्षरज्योती प्राथमिक विद्यालय व अक्षरज्योती इंग्लिश स्कूलच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी निर्मला ताई रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर साखर कारखान्याच्या संचालिका शोभा मतकर, माजी नगराध्यक्षा आशा माळी, डॉ. शुभांगी इंगळे, डॉ. रेश्मा चौधरी, सविता देशमुख, जयश्री कोहिरे, सिमा देठे, मुख्याध्यापिका मनीषा जोशी (दाणी), रेणुकामाता सेवाभावी संस्थेचे सचिव रवींद्र दाणी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस मान्यवऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस शाळेपासून सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. शाळा, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत नरहरी चौक, सराफा मार्केट, पोस्ट ऑफिस, कन्या शाळा असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीतील लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. शाळेतील विद्याथीं, मान्यवर यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयीं आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मीनल देशपांडे, स्वाती शिनगारे, स्वाती शर्मा, दीपाली आंबेकर, कीतीं गिराम, रीना पांडे, विद्या पैठणकर, वर्षा खिल्लारे, पल्लवी खरात, शीतल देवरे, दुर्गा सोनवणे, रंजना गायकवाड, मीरा सहाणे, राधिका पुरोहित आदीची उपस्थिती होती.