

Action was taken against 2,097 drivers through the third eye (surveillance camera).
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील तिसऱ्या डोळ्यांच्या माध्यमातुन महिला पोलिस अंमलदार कौशाल्या काळे, सीमा महाजन व पुजा सोनकांबळे यांनी मागील चार महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ९७ वाहनचालकांवर २२ लाख ५७ हजार ३५० रुपयांचा दंड केला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या कल्पनेतुन जालना शहरातील महत्वाच्या चौकात माईक सह कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातुन शहरातील संपुर्ण घडामोडीवर पोलीस अधिक्षक कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षातुन नियत्रंण ठेवण्यात येते.
नियंत्रण कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी अंनत कुलकर्णी तसेच शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप यांच्या नियत्रंणामध्ये काम करतो. महिला पोलीस अंमलदार कौशल्या काळे, सिमा महाजन व पुजा सोनकांबळे या सतत शहरांतील कॅमे-यावर नजर ठेवुन प्रत्येक घडामोडीची व हालचालीची नोंद घेऊन वरिष्ठांना असतात.
शहरातील कळवित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण कक्षात बसून नजर ठेवता येते. यामुळे जालना शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी आता सावध व सुरक्षीत वाहने चालविणे गरजेचे आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी या कॅमेऱ्याचे उदघाटन करण्यात आले होते. सप्टेंबर पासुन पोलीस महिला अंमलदार कौशल्या काळे, सिमा महाजन व पुंजा सोनकांबळे यांनी सतत प्रत्येक चौकातील कॅमे-यावर लक्ष ठेवून मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-याच्या माध्यमातुन टिपली व चार महिन्यामध्ये २०९७ वाहनांवर मोटार वाहन कायदयाप्रमाणे केसेस करुन २२ लाख ५७ हजार ३५० रुपयांचा दंड केला आहे.