Arjun Khotkar : जरांगे, मिशा आम्हालाही आहेत !

खोतकर यांचा इशारा : शिंदेंवरील टीका सहन करणार नाही
Arjun Khotkar
Arjun Khotkar : जरांगे, मिशा आम्हालाही आहेत !file photo
Published on
Updated on

Khotkar's warning: Won't tolerate criticism of Shinde

जालना, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थान न्याय दिला असून ज्याने दिले त्याच माणसावर टीका करणे म्हणजे हद्द झाली. जरांगे, मिशावर ताव देऊन चॅलेंज देऊ लागलात, तर आम्हालाही मिशा आहेत. आमच्या संयमाचा अंत पाह नका, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अशा शब्दात जालन्याचे आमदार तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जरांगेंवर टीकास्त्र सोडले. मराठवाड्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उघड-उघड जरांगेंवर टीका करण्याची पहिलीच वेळ आहे हे विशेष.

Arjun Khotkar
Jalna Crime : सोन्याचे आमिष दाखवून जबरी चोरी; दोन आरोपी अटकेत

आमच्या नेत्यावरील टीका कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केली जाणार नाही, आम्हीही समाजासाठी लढणारेच आहोत, असे ही खोतकर म्हणाले. जालना येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे हे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे नेते असून शिंदे समिती कोणी स्थापन केली? एसइबीसी आरक्षण कोणामुळे भेटले? सात लाख लोकांना कोणामुळे प्रमाणपत्र भेटले? असा सवालही खोतकरांनी केला.

जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे? आम्हाला माहिती आहे असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व समाजाने मान्य केले आहे. याचा अर्थ असा नाही तुम्ही शिव्या देत सुटावे आणि आम्ही सहन करु शकू. जरांगेंना कोण बोलायला लावतो हे समाजाला माहिती आहे, पुढे ते नाव जाहीर करु. आमचा इशारा आणि सांगणे आहे, शिंदे यांच्यावर टीका टाळा, तुम्हाला बोलता येते, पण आम्हाला यापेक्षा वेगळे बोलता येईल असे खोतकर म्हणाले.

Arjun Khotkar
Jalna rain shortage : पावसाचे अलर्ट कोरडे,पाण्याचा ठणठणाट

काय आहे मिशांचा वाद

मंगळवारी संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलतांना मनोज जरांगे यांनी आपल्या मिशांवर ताव मारत 'एकनाथ शिंदे, तुमच्या मिशा ज्या वर झाल्यात ना त्या माझ्यामुळेच. जशा तुमच्या मिशा वर करू शकतो, तशा त्या पुन्हा खालीही करू शकतो, याद राखा', अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news